मुंबई : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray )पक्षाकडून आतापर्यंत 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत . यावरून आता सांगलीत जागेवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्या रस्सीखेच सुरु आहे .ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील(Chandrahar Patil ) यांना सांगलीतून (sangli) लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. पण यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे . आता यात दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit R R Patil )यांनी उडी घेतली आहे . याबाबत ते म्हणाले , सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त आहे. सांगली जागेबाबत आज महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले . ,
शिरूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe)यांच्या प्रचारासाठी रोहित पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी बोलताना या मतदारसंघात आम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नागरिकांच्या मनात प्रचंड चीड आहे. पुणे जिल्ह्यातील आमचे दोन्ही खासदार हे संसदरत्न आहेत. इथल्या जनतेसाठी ते भांडले असलयाचे सांगितले . दरम्यान महाराष्ट्राच्या जडण-घडणीत शरद पवार यांचं मोठं योगदान आहे. गेली 55- 60 वर्ष ते महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत. हे नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. दिल्लीत प्रश्न मांडायचा म्हटला तरी आज महाराष्ट्रात केवळ शरद पवार हाच पर्याय आहे. शरद पवार हे ज्या प्रमाणे ताकद लावून चांगलं काम खेचून आणू शकतात. ती धमक इतर नेत्यांमध्ये नाहीत, असंही रोहित पाटील म्हणाले. याआधी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जात पक्षश्रेष्ठींपुढे आपली नाराजी व्यक्त केली आजही काँग्रेस या जागेसाठी आग्रही असलयाचे त्यांनी सांगितले . तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लागलेली आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. हे महाराष्ट्रातील नागरिकांनी ठरवलं आहे. सध्याच राजकारण खालच्या पातळीवर गेलेलं आहे. हे तरुणांना आणि जेष्ठ व्यक्तींना मान्य नाही असे सांगत सांगलीच्या जागेवर काँग्रेस ठाम आहे असे त्यांनी सांगितले . .
दरम्यान सांगलीमधून विशाल पाटील हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.मात्र ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारीवरून महायुतीतील मतभेद समोर आले आहेत. जवळच असलेला मतदारसंघ कोल्हापूरमधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढणार असल्याने ती जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली असून त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत.