मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक (Loksa Sabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) यवतमाळ -वाशीम (Yavatmal Washim Lok Sabha )मधून मोठा धक्का बसला आहे . या मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अभिजित राठोड (Abhijit Rathod )यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. या अर्जात त्रुटी असल्याने त्यांची उमेदवारी रद्द केल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि वंचितला निवडणुकांपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे.
याआधी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी दिली होती. यानंतर सुभाष पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली. पण ऐनवेळी सुभाष पवार यांना माघार घ्यायला लावून अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. मात्र आता अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याने तो रद्द झाला आहे. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघासाठी नामांकन दाखल करायच्या शेवटच्या दिवसाअखेरीस एकून 38 उमेदवारांची 49 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केले गेले. तर आज या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला . त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच त्यांना बाहेर काढण्यात आले आहे .
लोकसभेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांनी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र आता त्याचा उमदेवारी अर्ज रद्द केल्याने मंतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे .