मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group )लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का दिला होता . आता पुन्हा ठाकरे गट जळगावातील भाजपमध्ये (Bharatiya Janata Party) खिंडार पाडणार आहे .या निवडणुकीसाठी भाजपच्या 30 नगरसेवकांवर ठाकरे गटाने जाळं फेकलं असल्यांची माहिती समोर आली आहे .यासंदर्भातील एक फोटो समोर आल्याने जळगावात राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच भाजपला जळगावात (Jalgaon)मोठा धक्का बसणार आहे .
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil )यांचा पत्ता कापून स्मिता वाघ (Smita Wagh)यांना उमेदवारी दिली. त्यानंतर उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करून त्यांचे सहकारी करन पवार यांना लोकसभेचं तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला . त्यानंतर जळगावात जोर बैठकाना जोर आला आहे . अशाच एका बैठकीचा फोटो व्हायरल झाल्याने एक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या फोटोवरून ठाकरे गट जळगावात भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. भाजपचा विद्यमान खासदार पक्षात घेतल्यानंतर आता ठाकरे गटाने महापालिकेतील भाजपचे नगरसेवक फोडण्यावर भर दिल्याची माहिती समोर आली आहे .त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच जळगावात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान ठाकरे गट नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी फ़ुट्लायवर मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan)तातडीने भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत महाजन यांनी नगरसेवकांना पक्ष सोडून न देण्याची ताकीद केल्याची माहिती मिळाली आहे . तर जळगावातील महापालिकेत लोकप्रतिनिधी असलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर भाजपचे 30 पैकी जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याची मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभेआधीच भाजपला धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .