पुणे – पुणे लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची मानण्यात येतेय. या मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर ही जागा रिक्त होती. मात्र या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडून लागलीच नाही. आता २०१४ साठी पुण्यात तिरंगी लढत होईल असं वाटत असतानाच चौथ्या भिडूची एन्ट्री यात झालेली आहे.
कुणाकुणात मुख्य लढत?
पुण्यातून मुरलधीर मोहोळ या तरुण नेत्याला भाजपानं यावेळी संधी दिलेली आहे. तर मोहोळ यांच्यासमोर काँग्रेसच्या वचीनं कसबा पोटनिवडणुकीत यश मिळवून देणारे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. धंगेकर यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होत असल्याचं सांगण्यात येतंय. यातच मनसेला जय महाराष्ट्र करणारे वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुणे लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे. यातच आता एमआयएमनंही पुण्यात उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय.
एमआयएमची उमेदवारी कुणाला?
पुणे महापालिकेतील माजी नगरसेवर अनिस सुंडके यांना एमआयएमच्या वतीनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अनिस सुंडके यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेलं आहे. त्यांचे लहान बंधू रईस सुंडके हेही नगरसेवक राहिलेले आहेत. तर अनिस सुंडके यांच्या पत्नी 2017 साली राष्ट्रवादीच्या तिकिटीवर नगरसेवकपदी निवडून आलेल्या होत्या.
हेही वाचाः200हून अधिक कोटी, राजवाडा, विन्टेज कार, शाहू छत्रपती यांची संपत्ती किती?