नवी दिल्ली : उद्या 26 एप्रिल रोजी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात आठ मतदारसंघातील मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जागांवर मतदान होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेश मिळून ८८ लोकसभा मतदारसंघांवर मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, काँग्रेस नेता राहुल गांधी, शशी थरूर, अभिनेत्री हेमा मालिनी, रामायण मालिकेतील राम अरूण सह १,२०६ उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसचे राहुल गांधी वायनाडमध्ये सीपीआयतच्या अॅनी राजा आणि भाजपचे केरळ अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्याविरोधात उभे आहेत. तर शशी थरूर तिरुअनंतपुरममध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याविरोधात उभे आहेत.
आसाम – ५ (करीनगंज, सिलचर, मंगलदोई, नॉगोंग, कालियाबोर)
बिहार – ५ (किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूर, बांका)
छत्तीसगड – ३ (राजनांदगाव, महासमुंद, कांकेर)
जम्मू आणि काश्मीर – १ (जम्मू)
कर्नाटक – १४ (उडूपी चिकमगलूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बंगलोर ग्रामीण, बंगलोर उत्तर, बंगलोर मध्य, बंगलोर दक्षिण, चिकबल्लापूर, कोलार)
केरळ – २० (कासारगोड, कन्नूर, वडकारा, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम, पोन्नानी, पलक्कड, अलाथूर, थ्रिसूर, चालकुडी, एर्नाकुलम, इडुक्की, कोट्टायम, अलाप्पुझा, मावेलीकारा, पठानमथिट्टा, कोल्लम, कोल्लम)
मध्यप्रदेश – ७ (टिकमगड, दमोह, खजुराहो, सतना, रीवा, होशंगाबाद, बैतुल)
महाराष्ट्र – ८ (बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी)
मणिपूर – १ (बाह्य मणिपूर)
राजस्थान – १३ (टोंक-सवाई माधोपूर, अजमेर, पाली, जोधपूर, बारमेर, जालोर, उदयपूर, बांसवाडा, चित्तोडगड, राजसमंद, भिलवाडा, कोटा, झालावाड-बरन)
त्रिपूरा – १ (त्रिपूरा पूर्व)
उत्तर प्रदेश – ८ (अमरोहा, मेरठ, बागपत, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, अलीगढ, मथुरा, बुलंदशहर)
पश्चिम बंगाल – ३ (दार्जिलिंग, रायगंज, बालूरघाट)