ताज्या बातम्या राष्ट्रीय

काशीत प्रचाराला नाही तर लोकांचा उत्साह पहायला आलो!

मराठी माणूस मोदींच्या दिग्विजयाचा भागिदार: देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran

काशी – काशी (Kashi) येथे आपण प्रचाराला आलेलो नाही, त्याची गरज सुद्धा नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज काशी येथे केले.

काशी येथे काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी महाराज, केंद्रीय मंत्री भागवत कराड, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, जौनपुरचे भाजपा उमेदवार कृपाशंकर सिंह, मोहित भारतीय आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सनातन संस्कृती कधीही भेदभाव करीत नाही. या संस्कृतीचे प्रवाह कितीही भिन्न असले तरीही विचार केवळ मानवतेचा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या साहित्यात कायम काशीचा उल्लेख आहे.

ते म्हणाले, नवभारत म्हणजे केवळ रस्ते, इमारती नाही तर त्यात सनातन संस्कृती सुद्धा आहे. याच काशीचे पुनर्निर्माण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले आणि आज काशी विश्वनाथ कॉरिडॉर मोदीजी यांनी तयार केला.

हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे, तर अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आहे. या कालखंडात मला वाराणसीत येण्याचे भाग्य लाभले, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्र आणि काशी यांचे विद्वत्ता आणि संस्कृतीचे नाते आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे