मुंबई : शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Shiv Sena leader Sanjay Nirupam) यांनी जोगेश्वरीतील दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांत (SRA projects) हिंदूंची घरे मुस्लिमांना देण्याचे कटकारस्थान रचल्याचा आरोप बिल्डरांवर केला. हाऊसिंग जिहादच्या (Housing Jihad) माध्यमातून मुंबईची (Mumbai) डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
निरुपम यांनी सांगितले की, ओशिवरा येथील पॅराडाइज झोनमध्ये ४४ घरे ९५ वर गेली असून वाढीव ५१ घरे मुस्लिमांना (Muslims), त्यात ३० घरे बिल्डर अब्दुल गनी किताबुल्लाह यांच्या मुलांना, देण्यात आली. तसेच श्री शंकर झोपडपट्टी प्रकल्पातील ६७ घरे १२३ झाली असून अतिरिक्त घरे मुस्लिमांना विकली गेली आहेत. पूर्वी असलेले गणेश मंदिर (Ganesh Mandir) व देवीचा मंडप हटवून तिथे मदरसा (Madrasa) उभारल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणी एसआरएकडून चौकशी झाली असली तरी सखोल तपासाची मागणी निरुपम यांनी केली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दिल्ली दौऱ्यावर सडकून टीका करताना त्यांनी विचारले की, “हिंदू दहशतवाद” (Hindu Terror)म्हणणाऱ्या काँग्रेस (Congress) नेत्यांसोबत ठाकरे डिनर करतील का? काँग्रेसने भगवा आतंकवादाचे खोटे कथानक पसरवून मालेगाव बॉम्बस्फोटातील (Malegaon Bomb Blast) हिंदू कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवले, पण विशेष न्यायालयाने सर्वांना निर्दोष ठरवले, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करताना निरुपम म्हणाले की, चीनने (China) २,००० चौ.कि.मी. भूभाग घेतल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुरावे द्यावेत आणि सीमा व सुरक्षेवर बोलताना जबाबदारीने बोलावे.