महाराष्ट्र ताज्या बातम्या

“भोंदूबाबा खरात प्रकरणात पाळेमुळे खणून काढणार” : फडणवीसांचा इशारा, अंधश्रद्धेविरोधात कडक कारवाई

Devendra Fadnavis speaking in Maharashtra Assembly on bhoodubaba Ashok Kharat case and action against superstition

मुंबई : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्ष्म सीमारेषा ओलांडली जाऊ नये, महाराष्ट्रात भोंदूगिरीला कोणतेही स्थान नाही, असा ठाम संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील संपूर्ण पाळेमुळे खणून काढून कठोर कारवाई करण्याचा निर्धार विधानसभेत व्यक्त केला.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “श्रद्धा म्हणजे सकारात्मकता, प्रामाणिकता आणि इतरांचे अहित नको अशी भावना. आपण सश्रद्ध आहोत; मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील छोटी रेषा ओलांडली जाऊ नये.”

या प्रकरणावर अनेक सदस्यांनी व्यक्त केलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, मंगळवारी सविस्तर निवेदन दिल्यानंतरही नवीन माहिती समोर येत आहे. “ज्या सदस्यांकडे माहिती असेल त्यांनी ती शासनाकडे द्यावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र संतपरंपरेची भूमी असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, “दुरितांचे तिमिर जावो हीच आपली भूमिका आहे. अंधश्रद्धेविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल.” राज्यातील जादूटोणा विरोधी कायद्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विधी व न्याय विभागाची मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्याच्या कलम ३ अंतर्गत कारवाई शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कायद्याची अंमलबजावणी संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, न्यायसंहिता अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. इ-साक्ष प्रणालीचा वापर ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, दहा वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे.

हरवलेल्या महिला व मुलींबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, फक्त १.८६ टक्के प्रकरणे अपहरणाची असतात, तर विविध कारणांनी बाहेर गेलेल्या १ लाख ३१ हजार महिला व मुली घरी परतल्या आहेत.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात