महाराष्ट्र ताज्या बातम्या

शालेय सहलींमधून एसटीला १२७ कोटींचे उत्पन्न; २५ हजार बस फेऱ्यांतून विक्रम

School students standing in front of an MSRTC ST bus during a school trip in Maharashtra

मुंबई  – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शालेय सहल उपक्रमाने यंदा विक्रमी कामगिरी करत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असल्याची माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, शालेय सहल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि संस्मरणीय अनुभव असून सुरक्षित आणि माफक दरातील प्रवासासाठी एसटी ही विश्वासार्ह सेवा ठरत आहे.

राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या मागणीनुसार यंदा एसटी महामंडळाने २५,५५८ बस फेऱ्या उपलब्ध करून दिल्या. या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांनी धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांना सुरक्षित प्रवास केला.

शालेय सहलींसाठी एसटीमार्फत प्रवास केल्यास विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत मिळते. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा लाभ झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावर्षी सहलींसाठी अद्ययावत आणि नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी काळातही शालेय सहलींसाठी एसटी बसेस उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. शाळा आणि महाविद्यालयांनी खाजगी बसेसऐवजी एसटी सेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही सरनाईक यांनी केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात