महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीसाठी नोंदणी शुल्क पूर्णतः माफ

Farmers in rural Maharashtra discussing ancestral farmland partition with land documents and maps

महसूल विभागाचे स्पष्टीकरण; तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालय—दोन्हीकडे सूट लागू

मुंबई — राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेत, शासनाने वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक सोमवारी काढले.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत कुटुंबीयांमध्ये करण्यात येणाऱ्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर यापूर्वीच शुल्कमाफीची तरतूद होती. मात्र, अनेक नागरिक तहसीलदारांकडे न जाता थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी अर्ज करत असल्याने काही ठिकाणी शुल्क आकारले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते.

ही विसंगती दूर करण्यासाठी आता महसूल विभागाने स्पष्ट केले आहे की,  कलम ८५ अंतर्गत तहसीलदार पातळीवरील वाटणीपत्र, तसेच सहधारकांनी एकत्र येऊन थेट नोंदणी कार्यालयात सादर केलेले वाटणीपत्र या दोन्ही प्रकारांना नोंदणी शुल्कातून पूर्ण सूट लागू राहील.

या निर्णयामुळे शेतजमिनीच्या वाटणी प्रक्रियेत सुलभता येणार असून खर्चात बचत होईल. तसेच कुटुंबातील जमीनवाटपाशी संबंधित प्रलंबित वाद कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, नियमांतील अस्पष्टतेमुळे नागरिकांकडून शुल्क आकारले जात होते. आता नव्या स्पष्टीकरणामुळे तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालय—दोन्हीकडे नोंदणी शुल्क माफ राहील.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

2 Comments

  1. Merle Heutmaker

    April 20, 2026

    Just wish to say your article is as amazing. The clearness for your submit is simply excellent and i can suppose you are a professional in this subject. Fine together with your permission allow me to seize your RSS feed to stay up to date with approaching post. Thanks 1,000,000 and please keep up the enjoyable work.

  2. sfokcer topsde

    April 20, 2026

    Hello, i think that i saw you visited my website so i came to “return the favor”.I’m attempting to find things to improve my web site!I suppose its ok to use some of your ideas!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात