महाराष्ट्र ताज्या बातम्या

नांदेड-लातूर रेल्वे प्रकल्पासाठी राज्याने तातडीने निधी द्यावा; अमित देशमुख यांची विधानसभेत जोरदार मागणी  

Congress MLA Amit Deshmukh raises the demand for immediate state funding for the Nanded–Latur railway project during the Maharashtra Legislative Assembly session.

मुंबई : मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना जोडणारा बहुप्रतीक्षित नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारने आपल्या वाट्याचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली.

अमित देशमुख म्हणाले की, नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे प्रकल्प हा दोन्ही जिल्ह्यांतील जनतेच्या गेल्या अनेक दशकांपासूनच्या अपेक्षांचा विषय आहे. तब्बल ४७ वर्षांपूर्वी माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी या रेल्वेमार्गाची मागणी प्रथम मांडली होती. त्यानंतर विविध लोकप्रतिनिधींनी सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आहे.

ते म्हणाले की, या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समसमान आर्थिक वाटा उचलण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सुमारे ₹३,००० कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आपला निधी देण्यास तयार आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप आर्थिक हिस्सा उपलब्ध झालेला नाही.

राज्य सरकारने आपला वाटा तातडीने मंजूर केल्यास हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प मार्गी लागेल आणि नांदेड, लातूर तसेच मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे अमित देशमुख यांनी सभागृहात स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात