ताज्या बातम्या राष्ट्रीय

आता अमित शाहांकडे प. बंगालची जबाबदारी, भाजपची जुनी कोअर कमिटी बरखास्त

नवी दिल्ली

भाजपकडून पश्चिम बंगालमधील संघटनेत मोठा बदल केला जात आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून 2022 मधील 24 सदस्यांची कोअर समिती बरखास्त केली आहे. याऐवजी आता 14 सदस्य संख्या असलेली नवी कोअर कमिटी आणि 15 सदस्यांची निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली आहे. नव्या कोर कमिटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा समावेश आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा एकदिवसीय दौऱ्यासाठी कलकत्त्यात आहेत. एमजी रोड गुरुद्वारा आणि कालीघाट मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी राज्याच्या भाजप नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत जुनी कोअर कमिटी रद्द करणे आणि त्याऐवजी नव्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

नव्या निवडणूक समितीच्या सदस्यांमध्ये अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या नावांचाही समावेश आहे. याशिवाय सुकांता मजुमदार, सुभेन्दू अधिकारी, राहुल सिन्हा, आशा लाक्रा, सतीश धन, मंगल पांडे, अमित मालवीय, लॉकेट चटर्जी, दिलीप घोष, अमित्वा चक्रवर्ती आणि चार सरचिटणीसांना स्थान देण्यात आले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे