ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

‘आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही’, अर्थमंत्र्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी निवडणुका असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात येत नाहीत. मात्र करदात्यांसाठी मोदी सरकारने चांगली बातमी दिली आहे. वर्षिक ७ लाख उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

  • गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील लसीकरणावर भर. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या लसीकरणावर भर दिला जाईल.
  • मध्यमवर्गींसाठी सरकार गृहनिर्माण योजना आणणार. येत्या ५ वर्षात २ कोटी घरं बांधली जातील. पीएम निवास योजनेअंतर्गत ३ कोटी घरं बांधण्यात आली आहेत.
  • सुमारे १ कोटी महिला लखपती दीदी झाल्या, येत्या वर्षात ३ कोटी लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट
  • मच्छिमारांसाठी रोजगाराच्या ५५ लाख नव्या संधी उपलब्ध होणार
  • ४० हजार रेल्वे कोच वंदे भारत कोचमध्ये बदलणार
  • लोकसंख्या नियंत्रणासाठी समिती स्थापन करणार
  • रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली आहे. करदात्यांच्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानते. नव्या कररचनेत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.
  • राज्यांना बिनव्याजी कर्ज देणार
  • ई- वाहनांना आणखी प्रोत्साहन देणार
  • देशभरात आज 149 विमानतळ कार्यरत आहेत. ५१७ नवीन विमान मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
  • देशात नव्या मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात येणार.
  • दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी योजना सुरू करणार. किसान संपदा योजनेतून 38 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
  • मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग
  • आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  • घरांवरील सोलर पॅनल्सच्या मदतीने येत्या काळीत १ कोटी घरांना महिन्याला ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत पुरवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
  • आशा सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार

अर्थमंत्र्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

  • २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्यासाठी आमचं सरकार काम करत आहे.
  • उच्च शिक्षणात महिलांचा समावेश १० वर्षांत २८ टक्क्यांनी वाढला आहे. एसटीईएम अभ्यासक्रमांमध्ये मुली व महिलांचा सहभाग ४३ टक्के आहे.
  • 2014-23 मध्ये $596 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (FDI) आली. 2005-2014 या काळात आलेल्या एफडीआयच्या दुप्पट होते.
  • 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान किसान योजनेतून 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदत मिळाली आहे.
  • तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
  • तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.
  • 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल.
  • आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे.
  • स्किल इंडिया मिशनमध्ये 1.4 तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. 3000 नवीन आयटीआय तयार करण्यात आले.
  • गेल्या वर्षांत 25 कोटी लोकांची गरिबी दूर करण्यात सरकारला यश आले आहे. सरकारने 20 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. गरीब कल्याण योजनेंतर्गत ₹ 34 लाख कोटी खात्यांवर पाठवले.
  • पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांची 43 कोटी कर्जे मंजूर करण्यात आली. 30 कोटी मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना कर्ज देण्यात आले. 11.8 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे