X: @therajkaran
राष्ट्रवादीत बंड करून भाजपची हातमिळवणी केलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) भूमिकेला त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shreeniwas Pawar) यांनी विरोध दर्शवला. त्यांच्या या भूमिकेला कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पाठिंबा देत अजित पवारांना खडे बोल सुनावले आहेत. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली, तीच भूमिका अख्या महाराष्ट्राची आहे. सामान्य लोकांना कुठे तुम्ही विचारलं की, काय वाटतं, तर त्यांचे हेच मत आहे की, आपल्या काकाला सोडून जाणं हे योग्य नव्हतं. तीच भूमिका श्रीनिवास काकांनी दाखवून दिलेली आहे, असं रोहित पवार म्हणाले.
पवार म्हणून आम्ही विचाराबरोबर आहोत. विचार जर कोण जपत असेल तर आदरणीय पवार साहेब आहेत. अख्खं पवार कुटुंब हे विचाराबरोबर साहेबांबरोबर आहे. अजितदादांनी वेगळे भूमिका घेतलेली आहे. दादा आणि त्यांचं जवळच जे कुटुंब आहे, त्याच्यामध्ये काकी आणि दोन मुलं आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. पवार कुटुंबांनी त्यांना एकटं पाडलं नाही. त्यांनी स्वतः निर्णय घेऊन बाजूला होऊन स्वतःला एकटे पाडले आहे, असे कुठेतरी दिसत आहे, असं रोहित पवार म्हणाले. सध्या महायुतीतील परिस्थिती पाहता मला वाटत नाही की महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि दादांची जी राष्ट्रवादी त्याचा एक सुद्धा उमेदवार निवडून येईल असं आम्हाला वाटत नाही. या उलट महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असं रोहित पवार म्हणाले.
विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. विजय शिवतारे हे मंत्री राहिलेले आहेत. कदाचित त्याच्यामुळेच आणि पूर्वीचे काही संबंध असल्यामुळे अजित दादांना ते जास्त ओळखत असावे. त्या अनुषंगाने त्यांनी त्या बाबतीतले वक्तव्य केलेलं आहे. सत्तेत असणारा एक व्यक्ती जो एकनाथ शिंदे साहेबांचा जवळ आहे. तेच जर म्हणत असेल की तिथं अजित दादांचा पराभव होईल. याच्यावरूनच समजून घ्या. दुर्दैवाने दादा वेगळे झाल्यामुळे स्वतःला त्यांनी कुटुंबातून बाहेर पाडलं आणि आता सत्तेत असणारे नेते सुद्धा त्यांच्याबरोबर नाहीत, असा टोला रोहित पवारांनी लगावला.