मुंबई : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . शिंदेच्या शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे . मात्र त्यांच्या नावाला भाजपचा विरोध लक्षात घेता हे त्यांची उमेदवारी बदलण्याची वेळ आता शिंदेच्या शिवसेनेवर आली आहे .त्यामुळे आता धैर्यशील मानेंच्या ठिकाणी त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane) यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे .
सध्या हिंगोली, यवतमाळ वाशिम, हातकणंगले या मतदारसंघात उमेदवार बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. .एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यातल्या आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचा समावेश होता. या दोन्ही नावांना भाजपचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणचे उमेदवार मागे घेण्यात येणार असून त्या ठिकाणी नवीन चेहरे देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलून आता त्या ठिकाणी माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली शिंदे गटात सुरू असल्याची माहिती आहे. त्यांनी याआधी दोन वेळा हातकणंगले मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आली आहे .
दरम्यान निवेदिता माने या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून 1999 आणि 2004 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार होत्या. त्यानंतर 2009 साली राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 सालीही राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी, धैर्यशील माने यांनी त्यांच्या आई, निवेदिता माने यांच्या पराभवाचे सुढ़ काढत राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. आता त्यांच्या मातोश्री रिंगणात उतरल्यानंतर मैदान आखणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .,दुसरीकडे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे सुरुवातीपासून आग्रही आहेत. त्यांनी दोनवेळा मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच मविआने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी हा लोकसभा मतदारसंघ सोडला होता. मात्र राजू शेट्टी यांनी बाहेरून पाठिंबा महाविकास आघाडी द्यावा असा प्रस्ताव ठेवला. शिवाय ते महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी सांगितले होते .