ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांची ख्याती आता धमकी बहाद्दर अशी झालीय ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे जोरदार खटके उडताना दिसत आहेत . राष्ट्रवादीत बंड करून भाजप सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांनी २०१९ साली शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले यावरून बोलताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे . ते म्हणाले , तेच तेच अजून किती वेळा बोलणार, दुसरं काहीतरी बोला आता. अजित पवारांची (Ajit Pawar) ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. आपल्या मतदारसंघातल्या दहा लोकांना दररोज उठून ते धमक्या देतात असे राऊत म्हणाले आहेत . .

पंतप्रधान मोदींनी आधी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी, तुम्ही अपघाताने मोठे झालेले नेते आहात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान काय आहे? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावरही निशाणा साधला आहे. या दोघांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्यांना महाराष्ट्र माफ करणार आहे त्यांनी दोन्ही पक्ष फोडले. त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. एवढे खोटे बोलणारा पंतप्रधान बघितला नाही. त्यासाठी ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळ बघावा लागेल असा टोला राऊतांनी लगावला आहे . दरम्यान अमित शाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी आम्ही ओबीसी आरक्षण रद्द करू असे त्यांनी जाहीररीत्या सांगितले आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेने याची नोंद घेतली आहे, इतकेच मी सांगतो असे राऊत म्हणाले ,.

लोकसभा निवडणुकाच बिगुल वाजलं असताना आज नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन करावे लागत नाही. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात