मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा देण्याऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena)अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली असून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे (Amit Thackeray )यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा बालेकिल्ला असेलेल्या वरळी विधानसभेमध्ये लक्ष घातलं आहे.त्यामुळे आता वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असा सामना रंगणार आहे.
अमित ठाकरे हे विधानसभेच्या रिंगणात नसले तरी आता ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत . मनसेचे संभाव्य उमेदवार संदीप देशपांडे यांच्यासाठी ते आता ठिकठिकाणी सभा घेणार आहेत . दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आदेश दिले आहेत. वरळी, माहीम, शिवडी, ठाणे, कल्याण ग्रामीणमध्ये त्यांनी उमेदवारांना तयारीला लागण्यास सांगितले आहे. युवासेनाप्रमुख आणि शिवसेना(उबाठा) नेते आदित्य ठाकरे हे वरळीमधून आमदार असून त्यांच्याविरोधातही उमेदवार देण्याचे तूर्तास मनसेने ठरवले आहे . त्यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना हिरवा कंदील दिला असून नितीन सरदेसाई यांना दादर-माहीममधून आणि शालिनी ठाकरेंना वर्सोव्यातून तिकीट देण्याची शक्यता आहे.आदित्य यांच्या बालेकिल्ल्यात अमित यांनी यांनी एन्ट्री केली आहे.ते वरळीत विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत .
मनसेला विधानसभा निवडणुकीसाठीसज्ज झाले असून वरळी, दादर-माहीम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य आणि पुण्यातील जागा यांचा समावेश आहे .