पाटना
बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या वाहनाच्या काचाही फुटल्या आहेत. राहुल गांधी बिहारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. यादरम्यान बुधवारी राहुल गांधींची यात्रा बिहार-पश्चिम बंगाल सीमेवरुन जात होती. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राहुल गांधींच्या कारची काच फोडल्याचा दावा केला असून या प्रकरणात पोलिसांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
बुधवारी सकाळी राहुल गांधी आपल्या यात्रेदरम्यान रोड शो करीत होते. यादरम्यान त्यांच्या काळ्या रंगाची गाडी टोयोटा एसयूव्हीवर दगड फेकण्यात आला होता. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. सत्ताधारी पक्षांशी संबंध असलेल्या काही जणांनी हा हल्ला केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
बातमी अपडेट होत आहे.