जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अबब! भाजपाच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उत्पन्नात 5 वर्षांत 253 टक्क्यांनी वाढ, किती आहे एकूण संपत्ती?

मुंबई- जात प्रमाणपत्र वैध ठरल्यानंतर साश्रू नयनांनी आनंद व्यक्त केलेल्या नवनीत राणा यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. राणा पुन्हा निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. गुरुवारी दोन्ही पातळ्यांवर चांगला दिवस अनुभवणाऱ्या नवनीत राणा यांची पुढची वाटचाल सोपी नसेल, असं दिसतंय. राणा यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे एकवटलेले दिसतायेत. तर अमरावतीत वंचितही राणा यांच्या विरोधात असल्याचं दिसतंय. अशातच राणा यांच्या संपत्तीचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांची संपत्ती किती?

नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या वार्षिक उत्पन्नात गेल्या ५ वर्षांत २५३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या संपत्तीत ४०२ टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या काळात त्यांनी कोणतीही जमीन किंवा दागिने खरेदी केलेले नाहीत.

त्यांच्या स्थावर संपत्तीत ३० टक्के घट झाली आहे तर जंगम संपत्तीत ७५ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आलेली आहे.

नवनीत राणा यांच्या उत्पन्नात किती वाढ

नवनीत राणा यांचं २०१९ साली ४,२४,०३ उत्पन्न होतं. ते २०२४ साली १५,००,४५६ झालंय. ही वाढ २५३ टक्के आहे.

रवी राणा यांचं २०१९ साली २३,१३,३०४ उत्पन्न होतं, तर २०२४ साली हे उत्पन्न ४२,१३,२८५ इतकं झालंय.

नवनीत राणा यांची जंगम मालमत्ता २०१९ साली ३ कोटी २ लाख ९७ हजार ७५९ होती, ती २०२४ साली ५ कोटी ३२ लाख ३० हजार १२८ इतकी झालेली आहे.

रवी राणा यांची जंगम मालमत्ता २०१९ साली ६९ लाख ६८ हजार ५७७ इतकी होती. ती २०२४ साली ३ कोटी ४९ लाख ९२ हजार ४३२ इतकी झालेली आहे. ही वाढ ४०२ टक्क्यांची आहे.

नवनीत राणा यांच्याकडे २०१९ साली १४ हेक्टर जागा होती, ती २०२४ साली १५ हेक्टर झालेली आहे.

तर रवी राणा यांच्याकडे २०१९ साली १.५२ हेक्टर जमीन होती ती २०२४ साली २.२५ हेक्टर झालेली आहे.

नवनीत राणा यांच्याकडे ८४ तोळं सोनं आहे तर रवी राणा यांच्याकडे ७ तोळे सोनं असल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचाःधाराशीव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची अर्चना पाटील यांना उमेदवारी

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात