सोलापूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहितीये. पण हेही दिवस जातील याची खात्री होती. आणि सुदैवाने ते दिवस गेले आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ‘ असं धक्कादायक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रदेश अध्यक्ष असताना ते तीस महिने काय सहन केलं मला माहिती आहे. फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असती. मात्र कोणाच्याही मनात नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असं चंद्रकांत पाटील म्हणाले.