पंढरपूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत होते आहे. दोन्ही तरुण उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. यातच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यानं, त्याचा फायदा आता प्रणिती शिंदे यांना होईल असं दिसतंय. प्रवेश करतानाच्या सभेत दादांच्या सांगण्यावरुन सातपुतेंना आमदार केलं. आता हे पार्सल बीडला पाठवायचं आहे, असं मोहिते पाटील म्हणाले आहेत. यातच दुसरीकडे मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातही सातपुतेंसमोर नवं आव्हान उभं राहाताना दिसतंय.
भगीरथ भालकेंची साथ प्रणिती शिंदेंना
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांचे पुत्र आणि सध्या बीआरएसमध्ये असलेले भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर केलाय. लोकसभा निवडणुकीत भालके काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. राष्ट्रवादीमधून पोटनिवडणूक लढवलेले भगीरथ भालके मधल्या काळात बीआरएस पक्षात गेले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत ते आता मविआसोबत दिसतायेत. बुधवारी रात्री उशिरा भगीरथ भालके यांचे सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय भालकेंनी घेतल्याचं सांगण्यात येतंय.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भालकेंची मोठी ताकद आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांना तब्बल एक लाखांहून अधिक मतं पडली होती. यामुळं प्रणिती शिंदे यांना निवडणुकीत त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
हेही वाचाःभाजपाला निवडणुकीत किती जागा मिळतील?, राहुल गांधींनी व्यक्त केला अंदाज, इंडिया आघाडीबाबत काय म्हणाले?