मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मोठअया घडामोडी होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागावाटपावरुन तिढा निर्माण झालेला आहे. भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यां तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. शाहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या जागावाटपावर चर्चा होईल आणि तिढा सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय..
आज रात्री मुंबईत होणार बैठक
काल रात्री अमित शाहा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत. आज ते अकोल्यात जातील. अकोल्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी शाहा संवाद साधणार आहेत. त्यानंतर विदर्भातील मतदारसंघांचा आढावा ते घेणार आहेत. त्यानंतर रात्री उशिरा अमित शाहा मुंबईत येतील. रात्री त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे.
महायुतीत नेमका काय आहे तिढा
भाजपाला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जिंकायच्या आहेत. त्यामुळं ४८ पैकी २३ जागांवर भाजपा लढेल असं सांगण्यात येतंय. शिंदे शिवसेनेची मागणी हीी किमान १८ जागांची आहे. तर अजित पवार राष्ट्रवादी १० जागांसाठी आग्रही आहे. अशात काही मतदारसंघांत उमेदवार कुणाचा यावरुनही वाद सुरु आहे. या सगळ्यांवर तोडगा अमित शाहा यांच्या उपस्थितीत लागेल, असं सांगण्यात येतंय.
दोन दिवसांत भाजपाची यादी
राज्यातील भाजपा उमेदवारांचा उल्लेख, पहिल्या यादीत नसल्यानं भाजपाला टीकेचं धनी व्हावं लागलेलं आहे. शाहा यांच्याशी चर्चेनंतर पुढच्या दोन दिवसांत भाजपाची यादी जाहीर केली जाईल, असं सांगण्यात येतंय.
महायुतीत कोणत्या जागांवरुन अजूनही तिढा
१. पालघर
२. संभाजीनगर
३. कल्याण
४. मावळ
५. नाशिक
६. धाराशिव
७. हिंगोली
८. रामटेक
९. दक्षिण मुंबई
१०. रायगड
११. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
हेही वाचा: ‘भाजपसोबत जाणार नाही याची खात्री द्या’, जितेंद्र आव्हाडांच्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर