मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना […]

लेख

मराठवाडा कात टाकणार!

Twitter : @abhaykumar_d मराठवाड्याच्या कायापालटाचा करण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सोडला आहे. ४६ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या विकास कामांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे मराठवाडा नक्कीच कात टाकणार आहे.

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत : फडणवीस

Twitter : नागपूरकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या स्थितीचा आज नागपूर महानगरपालिकेत एका बैठकीतून आढावा घेतला. नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकरी कामगारांच्या मागण्यांसह जायकवाडी पाणी हक्कासाठी परभणीत शेतकरी कामगार संघर्ष परिषद

Twitter : परभणी  भाजपा प्रणीत फडणवीस-शिंदे-पवार सरकारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेची औरंगाबाद बैठकीत क्रूर थट्टा केली. एव्हढेच नाही तर हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा देखील अपमान केला आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यात 114 तालुक्यात दुष्काळ घोषित होवून उपाययोजना सुरु झाल्या, परंतु महाराष्ट्र सरकार जनतेला वाऱ्यावर सोडत आहे. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य किसान सभेने लढ्याचा पावित्रा घेवून दुष्काळ, जायकवाडी पाणीहक्क व शेतकरी कामगारांच्या मागण्या याबद्दल रविवार […]

लेख

सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

Twitter : @therajkaran लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे योग्य असले तरी समाजाच्या अधोगतीकडे दुर्लक्ष करून देशाची उन्नती होणे अशक्य आहे. सर्व समाजात शांतता, समता आणि ममता यांचा प्रसार करून सर्व मागासलेल्या वर्गाची विद्यादेवीच्या मंदिरात परस्परांशी ओळख पटविणे, देशबंधुत्व अनुभवास आणून देणे ही देशोन्नतीची अंगे आहेत, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अपात्र आमदार सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा – विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष या सुनावणीकडे आहे. त्यामुळे शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करावे. जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला कळू द्यावे की नक्की काय होत आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी विधानसभा […]

ताज्या बातम्या

शाळा बंद कराल तर याद राखा – नाना पटोले यांचा इशारा

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा (ZP schools) बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केला असून सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणांपासून वंचित ठेवणारा आहे. तरी, पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) […]

महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर

Twitter : @NalavadeAnant मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. मंगळवारी, गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, पाच विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली […]

विश्लेषण

महिलांचा कोटा वाढत असतांना भाजपचा भावना गवळींना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध; उद्धव सेनेस अनुकूल जागा?

Twitter : @vivekbhavsar मुंबई संसदेत महिलांसाठी लोकसभा आणि राज्य विधानसभेत 33 टक्के जागा आरक्षित करण्याचे विधेयक मांडले गेले असतांना आणि त्यावर चर्चा सुरू असतांना भारतीय जनता पक्षाने यवतमाळ – वाशिम मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकीट देवू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी राजकारण […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सनातन धर्माला संपविण्याची भाषा करणे हा निव्वळ मुर्खपणा : देवेंद्र फडणवीस

Twitter : @therajkaran इंदूरसनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट तो संपविण्याची भाषा करणारेच संपतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यप्रदेश येथे केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. काल उज्जैन येथे त्यांनी बाबा महाकालचे दर्शन घेतले […]