ताज्या बातम्या राष्ट्रीय

सनातन धर्माला संपविण्याची भाषा करणे हा निव्वळ मुर्खपणा : देवेंद्र फडणवीस

Twitter : @therajkaran

इंदूर
सनातन धर्माला संपविण्याची भाषा करुन स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. सनातन धर्म कधीच संपणार नाही, उलट तो संपविण्याची भाषा करणारेच संपतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यप्रदेश येथे केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. काल उज्जैन येथे त्यांनी बाबा महाकालचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजाअर्चा केली. आज सकाळपासून त्यांनी जनआशिर्वाद यात्रांमध्ये सहभाग घेतला आणि इंदूर, धार, कालीबिल्लोद, बेटमा, महू येथे जाहीर सभांना, बैठकांना संबोधित केले. या सभांना मंत्री मोहन यादव, राजवर्धन सिंग, विक्रम वर्मा आदी नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सनातन धर्म ही आपली प्राचीन संस्कृती आहे. देशात कुणीही इतरांच्या धर्माबद्दल बोलू नये. पण, अन्य कुठल्या धर्माबद्दल कुणी बोलले तर मोठा गहजब होतो. सनातन धर्म संपविण्याची भाषा करणे आणि त्यातून स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, यापेक्षा दुसरा कोणता मुर्खपणा असूच शकत नाही. सनातन धर्म तर कधीच संपणार नाही. पण, त्याविरोधात जे विचार व्यक्त करतील, ते स्वत:च संपल्याशिवाय राहणार नाही. सनातन धर्मावर जेव्हा-जेव्हा आक्रमण झाले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी अहि ल्यादेवी होळकर यांनी त्याचा विरोध केला. अहिल्यादेवी होळकर यांनी तर अनेक मंदिरांचे पुनर्निमाण केेले, हा इतिहास आहे.

ज्या प्रदेशात काँग्रेसने कोणती गॅरंटी दिली, तेथे त्यापैकी एकही वचन ते पूर्ण करु शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत नागरिकांच्या जीवनात जो बदल केला, तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसतो आहे. आज इंडी आघाडीत कुणीच कुणाला नेता मानायला तयार नाही. आघाडी एकमेकांना सामावून घेणारी असते. येथे मात्र तसे चित्र नाही. एका पक्षाचे दुुसर्‍या राज्यात अस्तित्त्व नाही, असे पक्ष एकत्र येऊन काहीच फायदा होत नसतो. राहुल गांधी सकाळी काय म्हणतात, ते त्यांना रात्री ठावूक नसते आणि रात्री जे बोलले ते दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना आठवत नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भाजपा सरकार असते, तेथे नेहमीच गरिबांच्या कल्याणाचा विचार होतो. काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला. पण, तेथे केवळ नेत्यांची गरिबी हटली. जनतेची गरिबी कधीही संपली नाही. आज गरिब कल्याणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्यांचा अधिकार देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या 9 वर्षांत झाले आहे. इंडी आघाडीचा एकाच अजेंडा आहे, मोदी हटाव. कारण त्यांना ठावूक आहे, आणखी 5 वर्षांसाठी मोदीजी आले, तर त्यांची दुकाने बंद होणार आहेत, अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे