महाराष्ट्र ताज्या बातम्या

वनजमीनीवरील अतिक्रमणकर्त्यांविरुद्ध दोन महिन्यांत फौजदारी कारवाई — वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – राज्यातील वनजमीनींवर अनधिकृतपणे उभारलेली धार्मिक स्थळे आणि इतर अतिक्रमणांची सखोल चौकशी करून येत्या दोन महिन्यांत संबंधित अतिक्रमणकर्त्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत केली. भाजप आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभा नियम क्रमांक १०५ अन्वये या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर […]

लेख ताज्या बातम्या

भाषिक अस्मिता नाही, हा लोकशाहीचा प्रश्न आहे!

By कॉम्रेड राजन क्षीरसागर भाषावार प्रांत रचना हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे. यासाठीच कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र, विशाल आंध्र, ऐक्य केरळा या भाषावार प्रांत रचनेसाठी कम्युनिस्ट पक्षच आघाडीवर राहिले. महाराष्ट्र राज्य हे कामगार शेतकऱ्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. कामगार नेते श्रीपाद डांगे आणि शेतकरी नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा त्यात मोठा सहभाग होता. एकूण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप आमदार फुकेंच्या भावजयीचे बंड थेट विधानभवनाच्या दरात! “मला फडणवीस वेळ का देत नाही…. त्यांना का वाचवताहेत”….?

मुंबई: सकाळी साधारणतः १३.३० ची वेळ…. विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने बाहेरील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक…… अशात गेटवर महिला पोलिसांची पळापळ…..वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांची मोठी संख्या…… गेटवर अधिवेशनकरीता आलेले कर्मचारी – अधिकारी बाहेर ताटकळत उभे…. दोन गोंडस मुलांच्या आर्त किंकाळ्या, रडारड….. माझ्या आईला का मारता…. तिला का पकडता….. सोडा माझ्या आईला….. तिला जाऊ दया….. अशी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर उद्योगपती सुशील केडिया झुकले! राज ठाकरे यांची जाहीर माफी मागत म्हणाले……, “आता मी सुद्धा मराठी शिकणार”…….

मुंबई : अगदी काल – परवापर्यंत ,“मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा,” असे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण तापवणारे उद्योगपती सुशील केडिया शेवटी शनिवारी विविध प्रसार माध्यमांना मुलाखती देत अखेर झुकले. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर माफी मागत आपली भूमिका मागे घेतली व म्हणाले “आता मी सुद्धा मराठी शिकणार,”…..! मराठीच्या मुद्द्यावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे ‘पँथरप्रेम’! ; नॅशनल पार्कमधील पँथरसोबत ‘दलित पँथर’!

मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (बोरिवली) ‘वन्यप्राणी दत्तक योजना’ अंतर्गत बिबट्या (पँथर) दत्तक घेतला. सलग सात वर्षे बिबट्या दत्तक घेणारा पहिला केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. या उपक्रमात यावर्षी आठवले यांनी ‘सिंबा’ या बिबट्याला वर्षभरासाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंजवडीची ओळख IT क्षेत्रामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर; समस्यांकडे लक्ष देणे अत्यावश्यक – खासदार सुप्रिया सुळे

पुणे : हिंजवडीची ओळख आयटी क्षेत्रामुळे केवळ राज्य किंवा देशापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सुळे यांनी हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात राजीव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात मार्च-एप्रिलमध्ये ४७९ शेतकरी आत्महत्या; मदत फक्त मोजक्यांनाच, शेतकरी कुटुंबांना वाढीव मदतीचा प्रस्तावही नाही – मदत व पुनर्वसन मंत्र्यांचा खुलासा

मुंबई – मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. मार्च २०२५ मध्ये राज्यात एकूण २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी विधानसभेत आज लेखी उत्तराद्वारे मान्य केले. याचप्रमाणे एप्रिल महिन्यातही २२९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच केवळ दोन महिन्यांत ४७९ शेतकरी आत्महत्यांचे गंभीर चित्र समोर आले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘जय गुजरात’ घोषणेवरून आपचा हल्लाबोल; “शिंदेंची सत्तेची लाचारी – महाराष्ट्रावरील सांस्कृतिक आणि आर्थिक आक्रमणाचा पुढचा टप्पा”

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात ‘जय गुजरात’ अशी घोषणा केल्यावरून आम आदमी पार्टीने जोरदार टीका केली आहे. “ही घोषणा केवळ शब्दांची नाही, तर महाराष्ट्रावर चालवण्यात येणाऱ्या सांस्कृतिक आणि आर्थिक बुलडोझर राजकारणाचा पुढचा टप्पा आहे,” असा आरोप आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. किर्दत म्हणाले, “सत्तेसाठी ‘खोके-बोके’ राजकारण करणाऱ्या भाजप आणि शिंदे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“एसटी पास थेट शाळेत” योजनेला उस्फूर्त प्रतिसाद; ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

मुंबई –राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” या अभिनव योजनेला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, केवळ १५ दिवसांत ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते म्हणाले, “शाळा-महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू झाले असून, या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अध्यक्ष आसनावरून राजकीय शेरेबाजी? वडेट्टीवार संतप्त; “पदाची गरिमा राखा” अशी खडसावणी

मुंबई –विधानसभेतील अध्यक्षपदाच्या कार्यपद्धतीवर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले, जेव्हा तालिका सभापती चेतन तुपे यांनी अध्यक्ष आसनावरून राजकीय टिप्पणी केली. यावर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार संतप्त होत म्हणाले, “पदाची एक गरिमा असते, ती राखली गेली पाहिजे.” शुक्रवारी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना काही आमदार अनुपस्थित होते. यावर टिप्पणी करत तालिका सभापती चेतन तुपे यांनी […]