महाराष्ट्र ताज्या बातम्या

खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेसवर कारवाई करा – ॲड. अमोल मातेले यांची मागणी

मुंबई : खाजगी कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत इंटिग्रेटेड कोर्सेसविरोधात तातडीने कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली. मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या भेटीत त्यांनी यासंदर्भात लिखित निवेदन सादर केले. ॲड. मातेले यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास खालील गंभीर बाबी आणून दिल्या: ११वी-१२वी […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

’सारथी’, ‘महाज्योती’, ‘आर्टी’मध्ये प्रवेश आता फक्त गुणवत्तेवर – अजित पवारांचा निर्णय

मुंबई : राज्यातील महत्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आता गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश दिला जाईल, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. यामध्ये ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘बार्टी’ आणि ‘आर्टी’ या संस्थांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या सर्व संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता आणि सुसूत्रता आणली जाणार असून, त्यासाठी लवकरच निर्णायक निर्णय घेतले जाणार आहेत. विधान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

घरकुलासाठी वाळू पोहोचविणारे नवीन धोरण येणार – महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या वाळूची वाहतूक परवडणारी व्हावी म्हणून वाळू थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे नवीन धोरण लवकरच तयार करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. ज्येष्ठ भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत प्रश्न केला, “सामान्य जनतेच्या कष्टातून राज्य उभे राहते, मग […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन खरेदी प्रकरणाची चौकशी होणार – आरोग्य राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई : कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आस्थापनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. चर्चेत विजय वडेट्टीवार व राहुल पाटील यांनीही सहभाग घेतला. राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या निवडणुकीत अॅड. अप्पासाहेब देसाई यांचे पॅनेल बिनविरोध विजयी

शीव, मुंबई : शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अॅड. अप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बिनविरोध निवडून आले. सर्व सभासदांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, माजी धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी ही घोषणा वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. नवीन कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२५-२६ ते २०२९-३० […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रशासकीय व विनंती बदल्यांबाबत तातडीने निर्णय घ्या – अधिकारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्य शासनाच्या विविध खात्यांतील प्रशासकीय व विनंती बदल्यांचा निर्णय अद्यापही रखडल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे या बदल्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आज दिलेल्या निवेदनातून केली आहे. महासंघाने निदर्शनास आणले आहे की, अनेक अधिकाऱ्यांना कौटुंबिक तसेच आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी समजत नसेल तर हिंदीत चालेल, पण इंग्रजी कशासाठी?” – सुधीर मुनगंटीवार यांचा सभागृहात सवा

मुंबई : “इंग्रजीत कामकाजपत्रिका हवी, असा आग्रह धरला जात असेल, तर अशा सदस्यांना थेट ब्रिटनच्या संसदेतच पाठवा,” अशी टोलेबाजी ज्येष्ठ भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. ते औचित्याच्या मुद्द्यावर बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, “एकीकडे आपण मराठीला अभिजात भाषा घोषित करण्याची मागणी करतो आणि दुसरीकडे काही सदस्यांना मराठीत विचार मांडता येत नाही. त्यांच्यासाठी हिंदीचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धर्मादाय रुग्णालये भ्रष्टाचाराचे केंद्र बनली; सभागृहात संतप्त चर्चा, सरकारची कारवाईची हमी

मुंबई : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये आतापर्यंत निर्धन आणि दुर्बल घटकांतील 93 लाख 17 हजार 334 रुग्णांनी उपचार घेतले असून, यासाठी तब्बल 36 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री स्वतः या योजनेवर लक्ष ठेवून आहेत. तरीदेखील जर पात्र रुग्णांवर उपचार नाकारले जात असतील, किंवा भ्रष्टाचार होत असेल, तर अशा तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे कराव्यात, कठोर कारवाई […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्व धारावीकर पात्र; केवळ कागदपत्र न दिल्यास अपात्र ठरणार!

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी ) आणि महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तपणे मसुदा परिशिष्ट-II टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करणे सुरू केले असून, धारावीतील नागरिक आशेने आणि उत्सुकतेने याकडे पाहत आहेत. सेक्टर ६ (मेघवाडी व गणेश नगर) साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ७५% हून अधिक झोपडपट्टीधारकांना नव्या घरांची पात्रता मिळाल्याचे डीआरपीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. […]

मुंबई ताज्या बातम्या

खान मुंबईचा महापौर झाला तरी शहराचा विकास करेल: समाजवादीचे आमदार रईस शेख यांचा विधानसभेत दावा

मुंबई : मुंबई शहर सर्व जाती धर्मियांचे असुन या शहराच्या महापौरपदी पारशी, बोहरी, खोजा, मेमन, पटेल, आगरी, कोळी, मुस्लीम महापौर राहिलेले आहेत. उद्या कोणी खान महापौर झाला तरी तो शहराच्या विकासात योगदान देईल. खानसुद्धा मतदारांनी निवडलेला नगरसेवक असेल, असा दावा समाजवादी पक्षाचे भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी बुधवारी नियम २९३ च्या प्रस्तावावर विधानसभेत बोलताना […]