राष्ट्रीय ताज्या बातम्या

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचा कम्युनिस्ट पक्षांनी केला तीव्र निषेध

मुंबई – भारतातील पाच प्रमुख कम्युनिस्ट पक्षांनी अमेरिकेच्या इराणविरोधी हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भाकप (मार्क्सवादी) चे महासचिव एम.ए. बेबी, भाकपचे महासचिव डी. राजा, भाकप (माले)-मुक्तीचे महासचिव दीपंकर भट्टाचार्य, आरएसपीचे मनोज भट्टाचार्य आणि फॉरवर्ड ब्लॉकचे जी. देवराजन यांनी संयुक्त निवेदनात ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग करणारी असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामुळे पश्चिम आशियात गंभीर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली, रेल्वे वाहतूक ठप्प — प्रवाशांसाठी रात्री १२ पर्यंत फेरी सेवा सुरू

पालघर : अजमेर-बांद्रा ट्रेन गुजरातकडे जात असताना पालघर रेल्वे स्थानकावर एक आणि दोन नंबर ट्रॅक ओलांडत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुटली. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून स्थानक परिसरात सायरनचा आवाज सातत्याने ऐकू येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

मुंबई : देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान राहील, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे “सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : जमिनीच्या वादातून जोडप्यास मारहाण, शिवीगाळ

८ जणांविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग व जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल महाड – हॉटेलच्या जागेसंदर्भातील जुन्या वादातून एकाच कुटुंबातील आठ जणांनी एका जोडप्यावर हल्ला करून त्यांना मारहाण केली, जातिवाचक शिवीगाळ केली आणि अश्लील वर्तन केल्याची गंभीर घटना महाड शहरात घडली आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तसेच विनयभंग आणि जीवघेणा हल्ला करण्याचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule on Uddhav : सेना गेली… ‘शिव’ हरवले… अन् ‘हिंदुत्व’ही सोडलं?”

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात मुंबई – “सेना गमावली, मग शिव हरवले, आणि आता हिंदुत्वही सोडलं,” अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गुरुवारी झालेल्या वर्धापन दिन सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Fadnavis on Uddhav : बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही!” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

मुंबई – “बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही,” या एकाच ठाम आणि सडेतोड वाक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या टोलेबाज भाषणाला प्रत्युत्तर दिलं. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावत, संपूर्ण राजकीय चर्चेला एका वाक्यात पूर्णविराम दिला. काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंच्या ‘युती’ प्रस्तावावर मनसेचा स्पष्ट नकार: संदीप देशपांडेंनी उघड केली उद्धव ठाकरे यांची डावपेचांची भूमिका

एक्स: @vivekbhavsar मुंबई : उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिनाच्या व्यासपीठावरून मनसेशी युतीबाबत दिलेले सकारात्मक संकेत हवेत विरले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ज्या थेट आणि आक्रमक भाषेत या प्रस्तावावर आपली भूमिका मांडली आहे, ती एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावरचा अविश्वासच आहे. संदीप देशपांडे यांचे वक्तव्य हे केवळ राजकीय प्रतिक्रिया नाही, तर ते शिवसेना (उद्धव गट) च्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका” या विषयावर होणार सखोल विचारमंथन

मुंबई: भारताच्या संसदेतील अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असून, या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २३ व २४ जून २०२५ रोजी विधान भवन, मुंबई येथे “संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद” आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्या उपस्थितीत होणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात पाच प्रसिद्ध आर.जे. घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत

२१ जून रोजी आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ सोहळा; आशा भोसले, सुदेश भोसले यांची उपस्थिती मुंबई: जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देशातील पहिल्या ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’चे आणि ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथील सभागृहात हा कार्यक्रम दुपारी २ वाजता पार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

संध्याकाळी ५ नंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? आयोग उत्तर का देत नाही? : काँग्रेसचा सवाल

मुंबई: “निवडणूक आयोग ही मोदी सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारी यंत्रणा बनली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी लपवण्यासाठी अवघ्या ४८ तासांत लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम ९३ मध्ये बदल करण्यात आला,” असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्र निवडणुकीत भाजप युतीने सत्तेवर येण्यासाठी निवडणूक […]