Mumbai : खोदकाम केलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण
मुंबई: रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दिनांक २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून दिनांक ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक (Barricades) हटविले जातील व रस्ते वाहतुकीस खुले होतील, […]