राज्यासाठी लवकरच ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ लवकरच आणण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. […]