महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोळसा वाहतुकीत ओव्हरलोडचा सुळसुळाट

पोलिस-आरटीओच्या ‘आशीर्वादाने’ अपघातांना आमंत्रण! महाड : कोकणातील औद्योगिक क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या दगडी कोळशाची अवजड वाहनांमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. वाहनांच्या मूळ रचनांमध्ये फेरफार करून जास्तीत जास्त कोळसा भरून मुंबई-गोवा महामार्गावरून ही वाहतूक सुरू आहे. मात्र, रस्त्यावर सतत तैनात असलेले परिवहन (RTO) आणि पोलिस प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने ही वाहतूक कुणाच्या […]

मुंबई

५ वर्षांचा बदलापूरचा ‘हेमंतकुमार’; युग मानगेकरच्या गाण्याला रसिकांची भरभरून दाद

By योगेश त्रिवेदी मुंबई : कुळगांव-बदलापूर मेडिकल असोसिएशन या डॉक्टर्सच्या संघटनेचा वार्षिक सांगीतिक कार्यक्रम नुकताच बदलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध कलाप्रदर्शनातून संगीताचा मनमुराद आनंद घेतला. या मैफिलीचा विशेष आकर्षण ठरला अवघ्या पाच वर्षांचा युग दिलीप मानगेकर. त्याने आपल्या गोड आवाजात सादर केलेले ‘है अपना दिल तो आवारा’ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा; तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई – “ज्यांची जेवढी लोकसंख्या, तेवढा त्यांचा हक्क,” या तत्त्वानुसार देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने केली. प्रारंभी विरोध दर्शवलेल्या भाजपाला अखेर ही मागणी मान्य करावी लागली. आता सरकारने तातडीने जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून, तेलंगणा व कर्नाटकप्रमाणे पद्धत राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांचा त्याग महत्त्वाचा; पुनर्वसन व पर्यायी जमीनवाटपाची तातडीने कार्यवाही करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – “कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांनी राज्याच्या विकासासाठी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी जमीन देणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि जमीन वाटपाच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. “संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावांची तपासणी करून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वर्चस्ववादाच्या फेऱ्यात अडकल्या भाजपच्या २२ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या?

मुंबई : भारतीय जनता पक्ष (भाजप) हा इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक शिस्तबद्ध आणि संघटनात्मक दृष्टिकोन ठेवणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र महाराष्ट्र भाजपमधील अलीकडील घडामोडींनी हा समज डळमळीत करत पक्षातील अंतर्गत वर्चस्ववादाचे चित्र उघड केले आहे. घटना अशी की, दोनच दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या ८० संघटनात्मक जिल्ह्यांपैकी केवळ ५८ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट’च्या प्रारुपवार प्राथमिक चर्चा

व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात नागरिकांच्या सूचना मागवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई – नीती आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तयार करण्यात येत असलेल्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट’चे प्रारुप कसे असावे या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. व्हिजन डॉक्युमेंटसंदर्भात नागरिकांच्या सूचना मागविण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘विकसित महाराष्ट्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार

महाराष्ट्रात ५,१२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक; २७,५१० रोजगाराच्या संधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांच्यात हा करार स्वाक्षरीत […]

लेख

‘गवई’ न्यायदानात सर्वोच्च ‘भूषण’ ठरावेत !

By योगेश वसंत त्रिवेदी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भूषण रामकृष्ण गवई यांच्या नांवाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश श्री. संजीव खन्ना यांनी केली असून ते मे २०२५ मध्ये सरन्यायाधीश पदी विराजमान होत आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतीशय आनंदाची, प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची बाब आहे. न्या. भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते, महाराष्ट्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शरद पवार यांना भीमा कोरेगाव प्रकरणात रस उरला नाही का? वंचित बहुजन आघाडीचा सवाल

मुंबई: भीमा कोरेगाव दंगली संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्यावर चौकशी आयोगाकडून पाठवलेल्या दोन नोटीसाही निष्फळ ठरल्याने, आता “शरद पवार यांना भिमा कोरेगाव प्रकरणात रस उरला नाही का?” असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. भिमा कोरेगाव चौकशी आयोगाने 24 जानेवारी 2020 रोजी पवार यांनी तत्कालीन […]

Sports

मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर : द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर सन्मान

मुंबई : क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिले जाणारे ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. २०२० ते २०२४ या कालावधीतील पाच वर्षांचे पुरस्कार यंदा एकत्रितपणे देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यंदा सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक दिवंगत द्वारकानाथ […]