नागपूर – चंद्रपुरात भाजपाचे उमेदवार असलेले भआजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मतदारसंघात महायुतीतूनच बळ मिळत नसल्याचं दिसतंय. या मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे अद्याप मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले नाही. इतकंच काय तर जोरगेवार यांचे साथीदार उघडपणे मुनगंटीवार यांच्यावर टीका करताना दिसतायेत. याबाबत मुनगंटीवार यांना विचारणा केली असता त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे.
काय म्हणालेत मुनगंटीवार
आमदार जोरगेवार यांनी प्रचारात सहभाग घेतलेला नाही. त्यांचे अतिशय उजवे मानले जाणारे आपल्यावर खालच्या भाषेत टीका करत आहेत, असं मुनगंटीवार म्हणालेत. हा पाठिंबा समजायचा की प्रेम समजायचं, असा सवाल मुनगंटीवार यांनी केलाय. केवळ खुर्चीसाठी त्यांच्यासोबत बसायचं, हे आपल्याला पटत नाही, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. आरपल्याला पद महत्त्वाचं नाही, जय-पराजय होत राहील असंही मुनगंटीवारांनी स्पष्ट केलेलं आहे. जोरगेवार यांनी कुणाला मदत करावी, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. जोपर्यंत आपल्यावरची खोटी टीका थांबत नाही तोपर्यंत जोरगेवार यांच्याशी संपर्क होणार नाही, हेही त्यांनी ,स्पष्ट केलेलं आहे.
जोरगेवार यांचं काय म्हणणं?
दुसरीकडे किशोर जोरगेवार यांनी प्रचारासाठी आपल्याला महायुती किंवा भाजपाकडून बोलावलेलं नाही, अ्सं सांगीतलेलं आहे. आपला कोणताही पक्ष किंवा जातीची व्होट बँक नसल्यामुळं बेरजेच्या गणितात आपल्याला मोजण्यात आलं नसावं, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
शिंदे-फडणवीस काय मार्ग काढणार?
महायुतीत असलेल्या तिन्ही पक्षांत आणि सोबत असलेल्या अपक्ष आमदारांत अनेक ठिकाणी असे वाद आहेत. याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसण्याची शक्यता आहे. अमरावतीतही राणा यांच्या विरोधात अडसूळ आणि बच्चू कडू हे उभे ठाकलेले दिसतायेत. अशा स्थितीत या तिढ्यावर महायुतीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःभिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला? साताऱ्यातून कोणाची वर्णी?