राष्ट्रीय ताज्या बातम्या

Arvind Kejriwal : मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

X: @therajkaran

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू असताना आता केंद्रीय तपास यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. कथित मद्य घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाचे (ED) पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी पोहोचले होते. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अखेर त्यांना  याप्रकरणीअटक करण्यात आलेली आहे.

दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून ईडीनं केजरीवाल यांची चौकशी सुरू केली होती. ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी केजरीवालांना अनेकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी हजर राहणे टाळलं. ईडी राजकीय हेतूनं समन्स पाठवत असून मला अटक करण्याचा त्यांचा प्लान आहे, असा आरोप केजरीवालांनी केला होता. नुकतंच ईडीने केजरीवालांना नवव्यांदा समन्स बजावलं होते. त्या विरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दंडात्मक कारवाईपासून संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. 

दिल्ली सरकारचे २०२१-२२ चे उत्पादन शुल्क धोरण तयार करताना आणि त्याची अंमलबजावणी करताना भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि खासदार संजय सिंह (Sanjay Singh) हे न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात केजरीवाल यांच्या नावाचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी केजरीवाल यांच्या संपर्कात होते. त्यातून आरोपींना बक्कळ फायदा झाला. त्या बदल्यात त्यांनी ‘आप’ला मोठा निधी दिला, असा आरोप तपासयंत्रणेनं केला आहे. दिल्ली सरकारमधील एक माजी मंत्री सत्येंद्र जैन हे देखील एका मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे