मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांना उमेदवारी दिल्यानंतर मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे . कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushif) यांनी साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही .तसेच यासाठी हेलिकॉप्टरने मतदारांना आणायला लागले तरी चालेल, पण मागे पडायचं नाही असं वक्तव्य केलं आहे . त्यांच्या या वक्तव्याचा आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) समाचार घेतला आहे . . ही सर्वसामान्य जनता आहे. त्या जनतेसमोर बडे लोग, बडी बाते करत आहेत ,या सर्वसामान्य जनतेला आता निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरची स्वप्न दाखवली जातायत असे म्हणत त्यांनी मुश्रीफांना टोला लगावला आहे .
बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रचारासाठी जोरदार धडाका लावला आहे . त्यात अनेक ठिकाणी जाऊन त्या नागरिकांच्या भेटी घेत आहे. सोबतच प्रत्येक सोसायट्यांमध्ये जाऊनदेखील त्या सोसायटीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना दिसत आहे. त्यांनी आज बारामती लोकसभा मतदार संघातील पिंपरी चिंचवड मधील ताथवडे भागात त्या प्रचाराला आल्या आहेत. इथल्या नागरिकांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला आणि मतदानाचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान त्यांनी कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे . दरम्यान या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha)मतदारसंघात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )विरुद्ध संजय मंडलिक (Sanjay Mandlik)अशी लढत रंगणार आहे ..त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
दरम्यान भाजपचे केवळ एकच स्वप्न आहे, ते म्हणजे शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवणे. महाराष्ट्रातला लढवैया नेता संपवायचा असल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि शरद पवारांना संपवण्याची भाषा चंद्रकांत पाटील करत आहेत. भाजपच्या पोटातलं ओठात आलं आहे . कारण भाजप पक्षाला वैचारिक विरोधक संपवायचा आहे. त्यामुळे ते लोकशाहीकडून दडपशाहीकडे हा देश घेऊन जात आहेत. आम्ही सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला आहे.