मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . उमेदवारी जाहीर होताच त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या मतदारसंघात झालेला विकास पाहून ठाकरेंची लढण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्याला पुढे करून “तुम लढो हम कपडा सांभालते है” अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली असे ते म्हणाले . तसेच कल्याणमध्ये मी प्रचंड मतांनी विजयी होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.,
या मतदारसंघात लढण्यासाठी मोठे मोठे वाघ फिरत होते ,आम्ही लढू आणि जिकूं म्हणून. कोणाकोणाची नावे घेतली कुठल्या कुठल्या नेत्यांची नावे घेतली गेली. कुठे गेले आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई असे म्हणत खासदार शिंदे यांनी ठाकरे पिता -पुत्रावर टीका केली आहे . कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ मोठया घोषणा करत ठाकरे लढणार असे सांगितलं जात होतं. ते कुठे आहेत.असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे . दरम्यान विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या दोनवेळा नगरसेविका वैशाली दरेकर यांच्याशी लढत होणार आहे. 49 वर्षीय दरेकर हे दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेशी संबंधित आहेत. त्यांनी इतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि आता एलएलबीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांचे पती हे अभियंता असून ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
दरम्यान या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या नावाला कोणताही विरोध नसून भाजप शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपण उभा राहील आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे