ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी, पंडालवरच 13 कोटींचा खर्च’; विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही यवतमाळला रवाना झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्याने जनतेचे हाल झाले. मोदींच्या सभेचा खर्च भाजपाने करण्याऐवजी तो सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. केवळ पंडालवरच १२ कोटी ७३ लाख ३३ हजार ५०० रुपये खर्च केला असून हेलिपॅडसाठी ३.५ कोटी रुपये खर्च केले असून ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्वयंघोषीत विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सभेसाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून गर्दी जमवण्यात आली आहे. बसमध्ये महिलांना कोंबून बसवले आहे, एखाद्या वाहनात जास्त लोक बसले तर RTO कारवाई करतात मग यांच्यावर कारवाई कोण करणार? भाजपासाठी कायदा वेगळा आहे का? जनता नरेंद्र मोदी व भाजपाला कंटाळली आहे. मोदींच्या सभेतील खुर्चीवर राहुल गांधी यांचे पोस्टर लावून जनतेने योग्य तो संदेश दिला आहे. याच यवतमाळमध्ये २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, स्वामीनाथन अहवाल लागू करणार, सत्तेत येताच पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करणार, अशी आश्वासने दिली होती परंतु सत्तेत येतात मोदी सर्व विसरले आणि तो चुनावी जुमला होता असे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक केली. यवतमाळ संतांची भूमी आहे, संतांच्या भूमित नरेंद्र मोदी खोटे बोलले. आता यवतमाळची जनता व शेतकरी मोदींच्या भुलथापांना फसणार नाहीत. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, शेतकरीच भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल.

जरांगेच्या एसआयटी चौकशीआडून भाजपाचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा..
महायुतीत जागा वाटपावरुन मोठा असंतोष व गोंधळ आहे, त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अंतरावली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांना भेटले होते त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक OSD सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहेत टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील तीन आमदारांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच..
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना मजबूत आहे, काहीजण भीतीपोटी पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते व जनता काँग्रेसबरोबरच आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन्ही आमदार माधवराव पाटील, मोहनराव हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकारी सर्वजण काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत. नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचा असून लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार दिला जाणार असून विजयी होणार आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा – तलाठी परीक्षा पेपर संदर्भातील घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा – नाना पटोले

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात