मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha )महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यात लढत रंगणार आहे . या निवडणुकीसाठी दोन्हीकडून जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावला असून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी आता भाजपावर (bjp )जोरदार निशाणा साधला आहे . भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसला (Congress ) टार्गेट केलं जात आहे. जनतेचं मन विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण आम्ही पण कोलाहपूरचेच …. . देशपातळीवर फोडाफोडीचं पेटंट फक्त भाजपाकडे आहे. भाजपाने पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे, त्यामुळे तो दुसऱ्या कुणाला लागू होऊ शकत नाही अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे .
कोल्हापूरची अस्मिता शाहू महाराजांच्या निमित्ताने दिल्लीला पाठवायची आहे. लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झाले आहेत. जनतेनं ठरवलं आहे खासदार बदला परिस्थिती बदलेल. खासदार बदला कोल्हापूर बदलेल हाच हट्ट कोल्हापूरकरांनी धरलेला आहे. आम्ही पण इथलेच आहोत. आम्ही पण कोल्हापूरचेच आहोत. काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रत्येक तालुक्यात कार्यालय हा उपक्रम राबवला जातोय. पाच वर्षात विद्यमान खासदार संजय मंडलिक करू शकले नाहीत म्हणून, ते आता टीका करत आहेत, असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.तर दुसरीकडे सांगलीत काँग्रेसला उमेदवारी न मिळता ठाकरे गटाला मिळाली आहे . यावरून काँग्रेस नेते विश्वजीत पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेसकडून शाहू महाराज लढणार जाहीर होताच अचानक उद्धव ठाकरे यांनी सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचे म्हटले आहे .
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी लोकसभेत महायुतीला पाठींबा दिला आहे . यावर देखील आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेचे राज्यातल्या जनतेला देखील आश्चर्य वाटतं आहे. राज ठाकरे महायुतीमध्ये जाऊन दोन-चार जागा लढवतील असं वाटलं होतं. मात्र, निवडणूकच लढवायची नाही ही भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य झाली असेल असं वाटत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांच्यामध्ये इतकं का परिवर्तन झालं हे कळायला मार्ग नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.