मुंबई : लोकसभा निवडणूका जवळ येत असताना आता लातूरमधून काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे . काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkar joins BJP) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने लातूरमध्ये भाजपची बळकटता वाढली आहे .या पार्श्वभूमीवर अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी मात्र काँग्रेसमधून कोणीही इतर पक्षात गेले, तरीही त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी गेल्या दहा वर्षात देशाच्या प्रगतीसाठी अनेक मोठी कामे केली आहेत . त्यांच्या निर्णयाने प्रभावित होऊनच मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. मी सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज सारख्या नेत्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांचं काम पाहिलं आहे. त्यांचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे, असं सांगतानाच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठी राहू द्या, असं अर्चना यांनी सांगितलं आहे . तसेच विकासाच्या कामाने देशाची प्रगती झाली आहे. मोदींनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन बिल आणलं आहे . त्यामुळे राजकारणात येण्यापासून घाबरणाऱ्या महिलांना आता राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मी भाजपात आले असे स्पष्ट अर्चना चाकूरकर यांनी सांगितलं आहे . त्यांच्याबरोबर उदगीरचे 7 वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे यांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधील एक मोठं कुटुंब आणि मराठवाड्यातील मोठ्या नेत्याची सून भाजपमध्ये आल्याने मराठवाड्यात भाजप अधिक बळकट होण्यास मजबूत होणार आहे.
दरम्यान या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी शिवराज पाटील यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे . ते म्हणाले , शिवराज पाटील यांनी मूल्यावर आधारीत राजकारण केलं आहे. त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. समाजकारणात त्यांचा मोठा वाटा आहे, असा गौरव त्यांनी केला . आता त्यांच्या सुनेच्या भाजपमधील पक्षप्रवेशाने आमची ताकद नक्कीच वाढणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे .