सातारा: मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी पुढील वर्षी राज्यभरात आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याची घोषणा केली. साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित प्रधानमंत्री आवास योजना घरकुल वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत विक्रमी कामगिरी केली असून, एका वर्षात पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत दिली जात असून, लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी अनुदानही देण्यात येणार आहे.
शेतकरी प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या सहकार्याने उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. राज्य सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक असून, ३० जूनपूर्वी निर्णय जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत देण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार ‘लखपती दीदी’ अभियानाला वेग देत असून, आतापर्यंत ५० लाख महिलांना या अभियानाशी जोडण्यात यश आल्याचे फडणवीस म्हणाले. हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास मंत्री Shivraj Singh Chouhan, ग्रामविकास मंत्री Jaykumar Gore, खासदार Udayanraje Bhosale यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ग्रामविकास योजनांसाठी ९,००० कोटी रुपयांचा धनादेश राज्य सरकारकडे सुपूर्द केला.

