X: @therajkaran
मुंबई: लोणावळ्यात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. मोदी सरकारने आश्वासन आणि दुसऱ्यावर टीका करणं यापलीकडे काय केलं आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी आहे, अशा शब्दात पवार यांनी मोदी यांच्यावर टीका केली.
निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गट पक्ष बांधणीसाठी नव्याने ताकदीने उभा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज लोणावळा (Loanavala) येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी अजित पवार (Ajit Pawar Group) गटाच्या 137 कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात (Ajit Pawar Group) प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्धीसाठी आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत. पण ही कोणाच्या पैशाने जाहीरात दिली जात आहे, तर जनेतेच्या पैशाने, अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे. आज ते सांगत आहेत की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. तसेच पक्ष स्थापनेपासून आम्ही आमची विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरुंबद्दल काहीही बोललं जात आहे. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हा देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते, असेही पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या ममता (Mamata Banerjee) यांच्यावरही बोलत आहेत. हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.