मुंबई- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्याच्या वेळी पंकजा मुंडे आणि अमित शाहा यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येतयं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात वनवासाबाबत सूचक वक्तव्य केलेलं आहे.
काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?
बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा मुंडेंनी पाच वर्षांचा वनवास भोगला असं वक्तव्य केलं. कलियुगात वनवास पाचच वर्षांचा असावा, असंही त्या म्हणाल्यात. जुन्या काळात १४ वर्षाचा वनवास होता, आता पाच वर्षच खूप झाला, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. यावेळी वनवास संपवण्यासाठी आपण सोबत आहात ना, असा सवाल त्यांनी समर्थकांना केला. कार्यकर्त्यांचं प्रेम महत्त्वाच आहे, त्यापुढं पद वगैरे महत्त्वाचं नाही, अ्संही पंकजा मुंडे या भाषणात पुढं म्हणाल्यात. या प्रेमाची परतफेड आपम करु, अ्सं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. आमदारकी, खासदारकीची संधी आली की नेहमी आपल्या नावाची चर्चा होते, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलंय.
लोकसभेला काळजी घ्या- पंकजा
यापूर्वी बीड जिल्ह्यात शिरुरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आजी-माजी पदाधिकाऱ्यांना आपली काळजी घ्या, असं आवाहन केलं होतं. सगल्या आजी लोंकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी. कारण तुमच्या आजी होण्यात माझा थोडा तरी वाटा असल्याचं पंकजांनी सांगितलंय. चार दिवसांत आचारसंहिता लागेल, त्यामुळं लोकसभएची काळजी घ्या, मग पुढची काळजी आम्ही घेऊ, असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं.
बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. प्रीतम मुंडे यांना डावलून आपल्याला संधी नको, अशी यापूर्वी पंकजा मुंडेंची भूमिका होती. मात्र पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर त्यांनी ही भूमिका बदललल्याचं मानण्यात येतंय.
हेही वाचाःसगेसोयरे अध्यादेशावर आचारसंहितेपूर्वी शिक्कामोर्तब?, जरांगे पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश?