मुंबई
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.
राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आणि म्हणूनच घरात वारसा असल्याने बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अखेर भाजपवासी झाले आहेत. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्व ज्यांनी विधानसभा आणि लोकसभा गाजवली, दोन वेळा ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले असे अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीची शक्ती वाढली आहे.
यात कुणाला शंका नाही. देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मोदींजींच्या नेतृत्वात आपण काम करावे असे अनेक नेत्यांना वाटत आहे. देशाला विकसीत करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यातूनच हा प्रवेश झाला आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने होणार आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे.