X : @therajkaran
मुंबई: महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मिळालेले यश हे पक्ष आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे ठरले आहे. आता विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly election 2024) जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उमेदवार निवडीच्या बैठका सुरु असताना घाटकोपर पश्चिम विधानसभा (Ghatkopar West Assemby constituency) मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारीसाठी अॅड. अमोल मातेले (Adv Amol Matele) यांच्या नावाची जोरदार मागणी होत आहे. मातेले यांच्या उमेदवारीसाठी मतदारसंघातील युवावर्ग, व्यापारी संघटना तसेच सामाजिक संघटनानी पाठींबा दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) ईशान्य मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार संजय पाटील (MP Sanjay Dina Patil) हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. यापार्श्वभूमीवर घाटकोपर पश्चिम मतदारसंघाच्या जागेसाठी रस्सीखेच चालू आहे. यात ऍड. अमोल मातेले हे शरद पवार राष्ट्रवादी (NCP Sharad Pawar group) युवक काँग्रेस मुंबई विभागीय अध्यक्ष आहेत. मातेले यांना उमेदवारी मिळावी म्हणून मुंबईतील युवा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन केले होते.
त्या सभेस मोठ्या प्रमाणात युवकांची गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी मातेले यांना पाठींबा देण्यासाठी होती. अॅङ मातेले हे विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष असताना त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विद्यापीठ स्तरावरील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना वेळोवेळी न्याय मिळवून दिला. तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणाला आंदोलनाच्या माध्यमातून विरोध दर्शवून रोजगाराचा तसेच शिक्षणाचा आणि आरोग्याच्या प्रश्नावर आंदोलने केली आहेत. त्यामुळेच घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून अॅङ अमोल मातेले यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी होत असल्याचे शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईचे उपाध्यक्ष कैलास कुशेर यांनी सांगितले.