हिंगोली : ‘मी तुमच्यासारखा घर कोंबडा नेता नाही. मी बाग देणारा कोंबडा नाहीये, कार्यकर्ता आहे. घरात बसून आरडा ओरड करत नाही. सर्व महाराष्ट्र सोडा आणि जळगावला येऊन बसा, पाच लाखांच्या वर लीड देईल’, असं ओपन चॅलेंज भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना दिलं आहे.
गिरीश महाजन पुढे म्हणाले, माझी औकात काय काढता, माझी औकात महाराष्ट्राला माहिती आहे. मी सात वेळेस निवडून आलेलो आहे. तुम्ही जनतेमधून निवडून येऊन दाखवा, आमदार होऊन दाखवा, खासदार होऊन दाखवा. मागच्या वेळेस या लोकसभा मतदारसंघांमध्ये 4 लाख 65 हजाराचे लीड होतं. यावेळेस पाच लाखाहून अधिक लीड दिलं जाणार, अशा शब्दात गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर घणाघात केला.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ४८ उमेदवार वैध ठरलं आहेत. परिणामी पक्षांकडून बंडखोरी केलेल्या नेत्यांची मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आज संध्याकाळपर्यंत मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल. हिंगोली मतदारसंघ वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे. मविआकडून ठाकरे गटाला तर महायुतीतून शिंदे गटाला ही जागा सोडण्यात आली. ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव जाहीर केलं. शिंदे गटाकडून सुरुवातील हेमंत पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. परंतू ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आला, आणि बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीकडून बी.डी. चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.