महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; विधानसभेत विरोधी पक्षाची मागणी

X: @therajkaran

नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधान सभेत आज राज्यातील अवकाळी  पाऊस, दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांची दुरावस्था हा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना उपस्थित केला. शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, संपूर्ण कर्जमाफी करा, (LoP Vijay Wadettiwar demands complete loan waiver for farmers) अशी मागणी आक्रमकपणे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तितक्याच जोरदारपणे उत्तर देताना पूर्ण माहिती घेऊन बोला, असे सुनावत महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिल, असे ठासून सांगितले.

महायुती सरकार काळातील (Mahayuti Government) या दुसऱ्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम् आणि राज्यगीताने झाली. तत्पूर्वी सत्ताधारी बाकांवरून काहींनी, “मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान अगली बार हिंदुस्थान”,अशा घोषणा दिल्या.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नियम-९७ अन्वये दिलेल्या स्थगन प्रस्तावावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बोलण्याची परवानगी दिली. यावर बोलतांना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. अवकाळी पावसाने २२ जिल्ह्यांत पूर्णतः दुरावस्था झाली आहे, पंचनामे (panchnama) पूर्ण होत नाहीत, आपण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, तेव्हा मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते. शासन टंचाईसदृश स्थिती असा नविन शब्दप्रयोग,अशी टिका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जायला तुम्हाला वेळ नाही. संपूर्ण कामकाज बाजूला ठेवून दुष्काळ स्थितीवर चर्चा करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचे खंडन करताना म्हणाले, चाळीस तालुके केंद्र सरकारच्या निकषानुसार घोषित झाले आहेत. उर्वरित बाराशे मंडले राज्य सरकारने दुष्काळसदृश घोषित केले. जे जे त्यांना मिळणार तेच यांना मिळणार आहे. राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले होते, यंदाही देऊ. एनडीआरएफपेक्षा (NDRF) अधिक देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मदतीचा निकष दोन हेक्टर वरून तीन हेक्टरमधील नुकसानभरपाई (compensation) असा असेल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली, तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.

तालिका सदस्य जाहीर

संजय शिरसाट, समीर कुणावार, चेतन तुपे, ॲडव्होकेट यशोमती ठाकूर या सदस्यांची नावे विधानसभा तालिका सदस्य म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली.

दिवंगत सदस्यांना आदरांजली

माजी राज्यमंत्री गोवर्धन मांगीलालजी शर्मा, माजी उपाध्यक्ष व माजी मंत्री व माजी विरोधी पक्षनेते बबनराव दादाबा ढाकणे, गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव दिनकरराव शिंदे, शेख रशिद शेख शफी, राजाराम नथु ओझरे, वसंतराव जनार्दन कार्लेकर, गोविंद रामजी शेंडे, दिगंबर नारायण विशे या माजी विधानसभा सदस्यांना आज विधानसभेत शोकप्रस्ताव संमत करून आदरांजली वाहण्यात आली.अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिवंगत सदस्यांप्रती भावना व्यक्त केल्या.

Also Read: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करू – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात