नवी दिल्ली : हरियाणात भाजपसोबत युतीत असलेला पक्ष जननायक जनता पार्टीचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना काल मंगळवारी पदावरून दूर व्हावं लागलं. त्यांच्या ऐवजी नायब सिंह सैनी यांना नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं आहे. नायब सिंह सैनी यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता हरियाणाच्या नव्या सरकारला आज सकाळी ११ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
सैनी यांनी ४८ आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आहे. सैनी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की, आम्ही राज्यपालांना विधानसभा सत्र बोलविण्याचा आग्रह केला आहे. यादरम्यान आम्ही बहुमत सिद्ध करू.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला सहा अपक्ष आमदारांचं समर्थन मिळालं आहे, ज्यामुळे ही संख्या ४७ पर्यंत पोहोचली आहे. जी ९० सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत बहुमताच्या आकड्याहून एकने अधिक आहे. जेजेपीचे पाच आमदारदेखील भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
राज्यातील जागावाटपावरुन भाजप आणि जेजेपीमध्ये झालेल्या मतभेदानंतर तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला सर्व १० जागांवर निवडणूक लढवायची आहे. जेजेपीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकला आली नव्हती. मात्र जागावाटपात त्यांनी दोन जागांची अपेक्षा आहे.
हरियाणात राजकीय अस्थिरता..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणाचे तत्कालिन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचं कौतुक करून २४ तास उलटताच मंगळवारी त्यांनी पटावरुन हटवण्यात आलं आणि त्यांच्याऐवजी भाजपचे खासदार नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी हरियाणामध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे सैनी यांना ऑक्टोबरपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळता येईल.