मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

ड्रग घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे : संजय राऊत

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

राज्यात ड्रग घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे असल्याचा खळबळजनक दावा उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

बिग बॉस २ चा विजेता एल्विश यादव विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये (Rave Party) सापाचे विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून हाच एल्विश यादव काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी आरती करताना दिसला होता. त्यावरून आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना व सरकारलाही लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.

संजय राऊत म्हणाले, या प्रकरणात एनसीबीचे (NCB) काय म्हणणे आहे? ते काही ग्रॅम चरस-गांजा पकडल्यावर मोठा तीर मारल्याचे नाटक करतात. या व्यक्तीला वर्षा बंगल्यावर कुणी आमंत्रित केले होते? मुख्यमंत्र्यांच्या निवासाशी त्याचा काय संबंध आहे? मुख्यमंत्र्यांचे कुटुंब किंवा मुख्यमंत्र्यांचे राजकीय कुटुंब ड्रग्ज व्यवहारात सहभागी आहे का? दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कुटुंबातले किती आमदार ड्रग्जचे सेवन करतात याची माहिती हवी असेल तर मी देईन, असाही दावा राऊत यांनी यावेळी केला.

एक ड्रग्ज माफिया सापांचे विष विकतो, रेव्ह पार्टीमध्ये त्याचा वापर करतो, तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर येतो आणि त्याचे आदरातिथ्य केले जाते. त्याच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात जो ड्रग्जचा व्यापार चालू आहे, त्याची सूत्र सरकारमध्येच तर नाही ना? अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली.

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही (Devendra Fadnavis) लक्ष्य केले. ते म्हणाले, गृहमंत्र्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. त्यांचे नेहमीचे वाक्य आहे की ‘मी तोंड उघडले तर तुमची तोंडं बंद होतील. आमची तोंडं बंद होणार नाहीत, आधी तुम्ही तोंड उघडा, अशा शब्दात राऊत यांनी फडणवीस यांना आव्हानही दिले. दिल्लीत एल्विश यादवबरोबर कोण ऊठबस करते? माझे अमित शाह (Amit Shah) यांना आव्हान आहे की हा विषय थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचला आहे. त्यावर सरकार काय कारवाई करणार आहे याचे शाह यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे