महाराष्ट्र ताज्या बातम्या

नारायण राणेंसाठी पूर्ण ताकदीने काम करु – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

X : @NalavadeAnant

मुंबई: तिकिट वाटपावर चर्चा सुरु असताना महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केली. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाल्यास पूर्ण ताकदीने काम करु,अशी ग्वाहीही सामंत यांनी सकाळी दिली. सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताच अवघ्या काही मिनिटात भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे याची सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha) उमेदवारी जाहीर करण्यात आली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चोविस तास उरले असल्याने महायुतीतील (Mahayuti) उमेदवाराचा संभ्रम दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले. उमेदवारी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा केली होती. चार दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोकणची जागा शिवसेनेला (Shiv Sena) मिळावी, अशी मागणीही केली होती. कारण धनुष्यबाण हा कोकणातील (Kokan) घराघरात पोहोचलेला आहे. त्यामुळे मतदारांना शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह माहित आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्गचे विजयाचे गणित फडणवीस यांच्यासमोर सादर करण्यात आले होते, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर किरण भय्या सामंत यांनी तूर्त थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर कुटुंबासोबत देखील चर्चा झाली. नारायण राणे ज्येष्ठ नेते असून ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली तरी आपण शिवसेना म्हणून पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणाने काम करु, अशीही ग्वाही सामंत यांनी दिली.

रत्नागिरी- सिंधुदुर्गची जनता महायुती (Mahayuti) सोबत आहे. महायुतीतील तेढ राहू नये आणि इंडिया आघाडी (INDIA alliance) आणि त्यांचे खासदार निवडून येऊ नये, यासाठी किरण सामंत यांनी माघारीचा निर्णय घेतला. उदय सामंत यांचे पुनवर्सन करण्याची धमक कार्यकर्त्यांमध्ये आहे, असेही सामंत यांनी सांगितले. विजयाकडे एखाद्या उमेदवाराला कसे न्यायचे हा इथला पॅटर्न आहे. वरिष्ठ नेतृत्वाने येथील परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेतल्याने चार पावले मागे येण्याचा निर्णय इथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असल्याचेही सामंत यांनी नमूद केले.

महायुतीत मीठाचा खडा पडणार नाही, याची दक्षता शिवसेनेने घेतली आहे. आता प्रचारात याबाबत दोन्ही बाजूने काळजी घ्यायला हवी, असे सांगतानाच कोणतीही अपेक्षा न ठेवता किरण सामंत यांनी हा निर्णय घेतला. आठ दिवसांपूर्वी केलेले ट्विट हे सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच करण्यात आले होते, असेही सामंत यांनी सांगितले. भाजपच्या एका नेत्याने कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र किरण सामंत यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहत हा प्रस्ताव नाकारला. हा किरण सामंत यांचा मनाचा मोठेपणा असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात