मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही . त्यात ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मानला जातो . पण ठाण्यात भाजपने दावा केला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे . दरम्यान अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad )यांनी ठाण्यातील उमदेवारीबाबत प्रतिक्रिया दिली आहे .ठाण्यात शिवसेना शिंदे गटाकडून कुणाला उमेदवारी दिली जाईल, हा माझा विषय नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ठाणे लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik )यांनाच तिकीट मिळणार, हे खात्रीने सांगतो. माझी मनापासूनची इच्छा आहे की, त्यांना तिकीट मिळावे असं त्यांनी म्हटलं आहे . .
दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर आपल्याबरोबर आलेल्या खासदारांना तिकीट मिळवून देत आपल्याच बालेकिल्ल्यात आपले आणि मुलाचे स्थान अबाधित राखण्याचा आटापिटा मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. या ठिकाणी भाजपकडूनच त्यांची अडचण केली जात असून, ठाकरे गट या सर्व गोष्टींचा फायदा उचलत आहे. खासदार शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून तेवढ्याच ताकदीचा उमेदवार दिला जाईल अशा चर्चाही होत आहेत . त्यासाठी आदित्य ठाकरे ( Aadity Thackeray ), वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ), सुषमा अंधारे ( Sushma Anadhare )अशा बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा करण्यात आली. तसेच शिंदेंवर नाराज असलेले सुभाष भोईर ( Subhash Bhoir ) यांचेदेखील नाव अग्रस्थानी होते. तसेच, केदार दिघे ( Kedar Dighe ) यांच्या नावाची नंतर शक्यता वर्तविली जात होती.आता यामध्ये कोणाला उमदेवार मिळणारं याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार असलेले राजन विचारे (Rajan Vichare) हे सध्या उबाठा गटात आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. दुसरीकडे भाजपाचे नेते आणि याच मतदारसंघाचे माजी खासदार संजीव नाईक हेदेखील ठाणे मतदारसंघासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ठाणे मतदारसंघ आपल्याकडे वळविण्याची दोन्ही पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. अशातच ठाण्यातून उमेदवार कोणता असणार याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे.
या सर्व घडामोडीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जुन्या मित्राला शुभेच्छा देत नावाचा उल्लेख केला आहे . मात्र नाशिक, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण आणि छत्रपती संभाजी नगर या मतदारसंघाठी शिंदे गटाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यापैकी भाजपा कोणते मतदारसंघ घेणार आणि यातील कोणत्या विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे .