महाराष्ट्र ताज्या बातम्या

पवारांसारख्या मोठया नेऱ्याने साध्या आमदाराला धमकी देणं योग्य नाही : फडणवीस

X: @therajkaran

मुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना ”आमच्या कार्यकर्त्यांना एकदा दमदाटी केली, आता बस्स. पुन्हा जर असं केलं तर शरद पवार म्हणतात मला…” असं म्हणत इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी यावर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पवार साहेब मोठे नेते आहेत. इतकी वर्षे ते राजकारणात आहेत. ५५ वर्षे ते राजकारण करत आहेत. या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी देण योग्य नाही.  

फडणवीस पुढे म्हणाले की, शरद पवारांनी त्यांच्या विधानाचा पुनर्विचार करावा. ते कुठल्या स्तराला आहेत, याचा विचार करावा. कुणी आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल असं मला वाटत नाही. शरद पवार यांच्या विधानानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके म्हणाले की, शरद पवार आमचे श्रद्धेय आहेत, उद्या देखील राहतील. पण साहेबांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं. मागील ५० ते ५५ वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर साहेबांनी कुठल्याही पदाधिकाऱ्यावर टीका केली नाही. विरोधकांवर देखील व्यक्तिगत टीका केली नाही. पण साहेबांनी माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं, याचं मला आश्चर्य वाटतंय, असंही शेळके यावेळी म्हणाले.  

दरम्यान, लोणावळ्यातील (Lonavala) शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असे सुनील शेळकेंनी आपल्याला धमकावलं आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली होती. त्यानंतर शरद पवारांनी आमदार शेळकेंना इशारा दिला. 

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात