भोपाळ
लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ आपला सुपूत्र नकुलनाथ यांच्यासह भाजपमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या कमलनाथ हे नकुलनाथ यांच्यासह दिल्लीला पोहोचले आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस सक्रिय असल्याचं दिसून येत आहे.
यादरम्यान काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अलर्ट झाले आहेत. काँग्रेसच्या आमदारांना रोखण्यासाठी पक्ष संघटनेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रदेश अध्यक्ष आणि नेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत. आमदारांशी संपर्क केला जात आहे. कमलनाथ समर्थकांनुसार, सात आमदार भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
कमलनाथ यांच्या जवळचे आमदार
माजी मंत्री सज्जन सिंग वर्माही दिल्लीला रवाना झाले आहेत. त्याचवेळी कमलनाथ यांच्या निकटवर्तीय आमदारांबद्दल सांगायचं झाल्यास, त्यात बेहारमधून संजय उईके, पांढुर्णामधून नीलेश उईके, परसियातून सोहन वाल्मिकी, सौनसरमधून विजय चौरे, अमरवाडामधून कमलेश शहा, मुरैनामधून दिनेश गुर्जर, मधु भगत यांचा समावेश आहे. परसवाडा येथून वारशिवनीतून विवेक पटेल, जबलपूरमधील लखन घंघोरिया, लखनादौनमधून योगेंद्र सिंग, केवलरीतून रजनीश सिंग, वारसिवनीमधून विकी पटेल, सतनामधून सिद्धार्थ कुशवाह, जुन्नरदेवमधून सुनील उईके, चौरईतून सुजित चौधरी यांचा समावेश आहे. याशिवाय मुरैना, जबलपूर आणि छिंदवाडाचे महापौर कमलनाथांचे निकटवर्तीय आहेत.
कमलनाथ यांचे सुपूत्र नकुलनाथ भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील काँग्रेसचं नाव हटवलं आहे. त्यांनी आपल्या प्रोफाइलमध्ये बदल करीत केवळ छिंदवाड्याचे खासदार इतकच लिहिलं आहे.